ऑनलाइन टीम / मुंबई :
सोने व चांदीच्या भावात आता पुन्हा अमेरिका व इराणमधील तणावामुळे मोठी भाववाढ झाली आहे. त्यामुळे सोनेच्या किंमतीत मागील सात वर्षाच्या तुलनेने उच्चांकी गाठली आहे. 10 एप्रिल 2013 नंतर सोन्याचा हा जागतिक बाजारातील आतापर्यंतचा सर्वाधिक दर आहे.
मागील दोन दिवसांत सोन्यामध्ये तब्बल 1800 रुपयांनी वाढ झाली आहे. वर्षाच्या सुरूवातीला एक जानेवारी रोजी सोनं प्रति तोळा 39 हजार 500 रुपये होते. दोन जानेवारीला 100 रुपयांनी वाढून ते 39 हजार 600 रुपये प्रति तोळा झाला. सोमवारी गोल्ड मार्केट सुरू झाल्यानंतर सोने प्रति तोळा 41 हजार रुपयांच्याही पुढे गेले होते. त्यानंतर दिवसअखेर सोन्याचा भाव प्रति तोळा 40,939रूपये असा स्थिर झाला.
सोन्याबरोबरच चांदीच्या मागणीत देखील वाढ झाली आहे. कमोडिटी बाजारात चांदीचा भाव 724 रुपयांनी वधरला असून प्रति किलो 48251 रुपये झाला आहे. तर सकाळच्या सत्रात चांदीने 48660 रुपयांचा उच्चांक गाठला होता.
दरम्यान, अमेरिका आणि इराणमधील संघर्षाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला आहे. आज शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला.