सातारा / प्रतिनिधी :
येथील सोनगाव कचरा डेपोलगत आज सकाळी ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातात कोणी ही जखमी झाले नसून लगेच पलटी झालेला ट्रॅक्टर जेसीबीच्या सहाय्याने बाजूला घेण्यात आला. या अपघाताची नोंद पोलिसात झाली नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की सातारा ते शेंद्रे या रस्त्यावर सोनगाव कचरा डेपो जवळ ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा टायर पंचर झाला.त्यामुळे उसाचा भार एका बाजूला गेल्याने चालकाचा ताबा सुटला अन ट्रॅक्टर पलटी झाला. सर्व रस्त्यावर ऊस ऊस झाला. या अपघाताची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले अन ट्रॅक्टर बाजूला घेतला. काही काळ इथे वाहतूक कोंडी झाली होती.