प्रतिनिधी / बेळगाव
शिवजयंतीनिमित्त सोनार गल्ली, वडगाव येथील युवकांनी म. ए. समितीच्या कोरोना आयसोलेशन सेंटरला मदत दिली. म. ए. समितीने सुरू केलेले आयसोलेशन सेंटर हे लोकवर्गणीतून सर्वसामान्यांसाठी चालविले जात आहे. त्यामुळे समाजातील व्यक्ती-संघटनांकडून मदतीचा हात पुढे केला जात आहे.
सोनार गल्ली गणेशोत्सव मंडळ व जय गणेश युवक मंडळातर्फे 10 हजार, गणेश साप्ताहिक फंड 5 हजार व युवा कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने 21 हजार 500 रुपये असे एकूण 36 हजार 500 रुपये समितीच्या पदाधिकाऱयांकडे सुपूर्द केले.