बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. वाढती कोरोना संख्या आणि खबरदारी संदर्भात आरोग्यमंत्र्यांनी आज अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी मंत्री सुधाकर यांनी कोरोनाच्या दुसऱ्या संभावना लक्षात घेऊन कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोविड केअर सेंटर (सीसीसी) येत्या आठवड्यात म्हणजेच सोमवारी चालू करण्यात येतील अशी माहिती दिली. तसेच सोमवारपर्यंत १ हजार बेड कोविड केअर सेंटर कार्यरत होणार असल्याचेही ते म्हणाले.
मंत्री सुधाकर यांनी वरिष्ठ अधिकारी आणि वरिष्ठ डॉक्टरांची भेट घेतल्यानंतर ते संयंत्रांवर चर्चा करण्यासाठी विधान सौध येथे पत्रकारांशी बोलत होते.
यापूर्वी बुधवारी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अशी माहिती दिली होती की राज्याच्या राजधानीत अशा तीन सीसीसी स्थापन केल्या जातील. राज्यात सध्या कार्यरत असलेल्या सक्रिय प्रकरणांपैकी बेंगळूरमध्ये ७२ टक्क्यांहून अधिक रुग्ण आहेत.