एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 385 वर, 201 रुग्णांवर उपचार सुरू
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
सोलापुरात नव्याने 21 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 12 पुरुष, 9 स्त्रियांचा समावेश आहे. तर दोघांचा मृत्यू झाला असून 26 वा बळी कोरोनाने घेतला आहे. आज 8 तर आतापर्यंत 158 व्यक्ती बरे होऊन घरी गेली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितसंख्या 385 वर पोहचली आहे. उर्वरित 201 व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी रविवारी दिली.
आज ज्या दोन व्यक्ती मृत पावल्या आहेत यात 65 वर्षीय महिला मोदीखाना परिसरातील आहे. ती 23 एप्रिल रोजी उपचारासाठी दाखल झाली होती. 16 मे रोजी मृत पावली. दुसरी व्यक्ती विजापूर नाका झोपडपट्टी 1 येथील 78 वर्षीय पुरूष असून 14 मे रोजी सिव्हीलमध्ये दाखल झाली होती 15 मे रोजी सायंकाळी मृत पावली.त्यानंतर दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
आज आढळलेल्या रुग्णांपैकी भवानीपेठ 1 पुरूष, विजापूर नाका झोपडपट्टी क्र.1 1 पुरूष, गोंधळे वस्ती 2 महिला, कोनापूरे चाळ 1 पुरूष, , राघवेंद्र नगर विडी घरकुल 1 पुरूष, भगवान नगर 1 पुरूष, नरसिंग सोसायटी 1 महिला, जुना विडी घरकुल 1 पुरूष, भारतरत्न इंदिरा नगर 1 महिला, गीतानगर साईबाबा चौक 3 महिला, शास्त्री नगर 1 पुरूष, बुधवार पेठ 1 पुरूष, 1 महिला, निलमनगर 1 महिला, न्यू बुधवार पेठ 1 पुरूष, रविवार पेठ 1 पुरूष, न्यू पाच्छा पेठ (मूळगांव टाकळी पंढरपूर) 1 पुरूष, शुक्रवार पेठ 1 पुरूष असे या भागातील नवीन रुग्ण आढळले आहेत.
आज एकूण 279 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 258 जणांचा रिपोर्ट निगेटिव आला तर 21 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आज एकूण 4099 जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 3714 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबधितची संख्या 385 वर गेली आहे. आतापर्यंत 385 कोरोनाबधितची संख्या झाली आहे. यामध्ये 209 पुरुष तर 176 स्त्री आहेत. 201 रुग्ण सिव्हिल रुग्णालयात उपचार घेत आहेत तर 26 व्यक्ती मृत झाले आहेत. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या 158 जणांना घरी सोडण्यात आले आहेत
सोलापुरातील कोरोना सद्यस्थिती
होम क्वांरटाईन- 5144
एकूण अहवाल प्राप्त : 4099
आतापर्यंत अहवाल निगेटिव्ह : 3714
आतापर्यंत अहवाल पॉझीटिव्ह : 385
उपचार सुरू- 201
बरे होऊन घरी गेले : 158
मृत- 26