तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापुरात कोरोनाबाधित आणखी 4 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. शहरातील कोरोनाच्या रुग्णाची एकुण संख्या 65 झाली आहे. 5 रुग्ण मृत झाले आहेत. उर्वरित 60 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी दिली.
यापैकी शास्त्रीनगर 2, न्यू फॉरेस्ट चांदणी चौक 1, सिविल हॉस्पिटल परिसर 1 असे चार कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तो भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. आतापर्यंत कोरोनाग्रस्ताची संख्या 61 होती त्यामध्ये 4 ने वाढ झाली असून संख्या 65 झाली आहे. 5 मृत झाले आहेत. असेही शंभरकर यांनी सांगितले. आज एकूण 23 अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी 19 अहवाल निगेटिव्ह आले तर चार अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
सोलापुरातील आयसोलेशन वार्डात 1280 व्यक्ती होते त्यापैकी 1075 जणांचे अहवाल प्राप्त झाला असून, यापैकी 1 हजार 10 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तर 65 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले आहेत. सोलापुरात नव्याने 4 कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहे.
सोलापूरातील कोरोना सद्यस्थिती
होम क्वरटाईनमध्ये: 2 हजार 171
आयसोलेशन वार्डात – 1280
-एकूण अहवाल प्राप्त : 1075
-आतापर्यंत अहवाल निगेटीव्ह : 1010
-आतापर्यंतअहवाल पॉझीटीव्ह : 65
-प्रलंबित रिपोर्ट- 205
-मृत : 05