तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर मध्ये कोरोना बाधितांची संख्या आता 360 इतकी झाली आहे. आज सोलापुरात १७ नवे रुग्ण आढळले असून दिवसेंदिवस धोका वाढत आहे.
आज सकाळी नऊ वाजता ही ताजी स्थिती प्रसिद्ध करण्यात आली. आज सकाळी 148 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 17 पॉझिटिव्ह अहवाल आहेत. त्यात दहा पुरुष आणि सात महिलांचा समावेश आहे. तर 131 निगेटिव्ह अहवाल आले आहेत. आज एकही मृत नोंद नाही.
आत्तापर्यंत 3734 जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. यापैकी ते 3374 निगेटिव्ह तर 360 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. आतापर्यंत एकूण 24 जणांचा मृत्यू झालाय तर 113 जण बरे झाले आहेत .