जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधवबरे झाल्याने 394 रुग्णांना सोडले घरी
तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शनिवारी 205 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारादरम्यान तीन रुग्णांचा मृत्यू झाला. तर उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 394 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी शनिवारी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शनिवारी 2146 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 205 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 1941 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 205 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 132 पुरुष आणि 73 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 27597 झाली आहे.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 207899
ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 27597
प्राप्त तपासणी अहवाल : 207830
प्रलंबित तपासणी अहवाल : 71
निगेटिव्ह अहवाल : 180231
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 753
रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 4506
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 22339
तालुका निहाय पॉझिटिव्ह रुग्ण
अक्कलकोट 1048, बार्शी 5048, करमाळा 1979, माढा 2837, माळशिरस 4671, मंगळवेढा 1279, मोहोळ 1194, उत्तर सोलापूर 704, पंढरपूर 5423, सांगोला 2131, दक्षिण सोलापूर 1284 आणि एकुण 27597
सोलापूर शहरात 52 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, एका रुग्णाचा मृत्यू
बरे झाल्याने 76 रुग्णांना सोडले घरी
सोलापूर शहारात शनिवारी नव्याने 52 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. उपचारा दरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर उपचार घेऊन बरे झाल्याने 76 जनांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी शनिवारी दिली.
सोलापुर शहरात शनिवारी 581 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 52 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 529 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 52 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 29 पुरुष तर 23 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8993 झाली आहे.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 85199
शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 8993
प्राप्त तपासणी अहवाल : 85199
प्रलंबित तपासणी अहवाल : 00
निगेटिव्ह अहवाल : 76206
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 498
रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 812
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 7683