प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी 194 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, तर उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 151 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी शुक्रवारी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी 902 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 194 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 708 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 194 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 120 पुरुष आणि 74 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3652 झाली आहे.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 26795
-ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 3652
-प्राप्त तपासणी अहवाल : 26671
-प्रलंबित तपासणी अहवाल : 124
-निगेटिव्ह अहवाल : 23019
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 103
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 1442
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 2108
Previous Articleसांगली : कोकरुडमध्ये 5 रुग्ण सापडल्याने गाव सात दिवस बंद
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.