अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गीत आढळला एक रुग्ण
एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या ११७ वर
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार
६९ व्यक्ती सिव्हिल रुग्णालयात घेत आहेत उपचार
मृत १०, एकूण बरे ३८
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात नव्याने १ कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली तर बाधित रुग्णामध्ये १ पुरुषाचा समावेश आहे. आज ४ तर आतापर्यंत ३८ रुग्ण बरे होऊन घरी गेली आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण ११७ कोरोबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित ६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी रविवारी दिली.
पॉझिटिव्ह रुग्णामध्ये मैंदर्गी तालुका अक्कलकोट एक पुरुषाचा समावेश आहे. आज ४४ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील १ पॉझिटीव्ह तर ४३ अहवाल निगेटिव्ह आले. अद्याप ६८ अहवाल प्रलंबित आहेत. ११७ रुग्णांपैकी ७३ पुरुष ४४ स्त्री आहेत. तालुक्यात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३८ जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – १५, बार्शी १९, माढा ७
माळशिरस ४, मोहोळ ५, उत्तर सोलापूर ९
सांगोला ३, पंढरपूर ७,
दक्षिण सोलापूर ४८,
एकूण ११७
होम क्वांरटाईन – २२१७
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती- १९८२
प्राप्त अहवाल- १९१४
प्रलंबित अहवाल- ६८
एकूण निगेटिव्ह – १७९८
कोरोनाबाधितांची संख्या- ११७
रुग्णालयात दाखल – ६९
आतापर्यंत बरे – ३८
मृत – १०