तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज गुरुवारी 193 नवे कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 122 पुरुष, 71 स्त्रियांचा समावेश आहे. आज 4 तर आतापर्यंत 1026 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 34 हजार 959कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 1 हजार 763 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 3162 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 2969अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 193 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 1026 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 32 हजार 170जण बरे होऊन घरी गेले आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे :
अक्कलकोट – 1151
मंगळवेढा – 1587
बार्शी – 6237
माढा – 3663
माळशिरस – 6310
मोहोळ – 1728
उत्तर सोलापूर – 778
करमाळा – 2138
सांगोला – 2720
पंढरपूर – 7136
दक्षिण सोलापूर – 1511
एकूण – 34,959
होम क्वांरटाईन – 11798
एकूण तपासणी व्यक्ती – 318157
प्राप्त अहवाल – 318099
प्रलंबित अहवाल – 58
एकूण निगेटिव्ह – 283141
कोरोनाबाधितांची संख्या – 34,959
रुग्णालयात दाखल – 1763
आतापर्यंत बरे – 32,170
मृत – 1026