वैराग / तरुण भारत संवाद प्रतिनिधी:
बार्शी येथे १९ डिसेंबर सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास गावातील ६५ वर्षीय वृध्देस ट्रॅक्टरने समोरून धडक दिल्याने उपचारादरम्यान तिचा २१ रोजी मृत्यू झाला. मृत्यूस कारणीभुत ट्रक्टर चालकाविरुद्ध ३० डिसेंबर रोजी वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत असे की ,१९डिसेंबर सकाळी ९ वा.सुमारास जया प्रल्हाद सुर्यवंशी (वय- 65 वर्ष ) रा. हळदुगे ता. बार्शी कामानिमीत्त घराकडून एस.टी. स्टॅन्डकडे रोडवरून पायी चालत निघाल्या होत्या. दरम्यान ट्रॅक्टर चालक लक्ष्मण निवृत्ती जगताप रा. हळदुगे ता. बार्शी याने त्याच्या ताब्यातील ट्रक्टरने जया सुर्यवंशी हीस समोरून जोराची धडक दिली. प्रथम त्यांना सिव्हिल हॉस्पीटल उस्मानाबाद येथे व नंतर सिव्हिल हॉस्पीटल सोलापूर येथे उपचारकरिता दाखल करुन पुढील उपचार चालू असताना 21रोजी सकाळी 10:30 वा.सुमारास त्यांचे निधन झाले .
ट्रॅक्टर चालक भरधाव वेगाने निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवुन, वृद्धेस गंभीर जखमी करून त्यांच्या मृत्यूस कारणीभुत ठरला आहे. त्यामुळे मयत महिलेच्या बहिणीचा मुलगा – लहू साहेबराव कांबळे (वय-42) रा.रुई ता. बार्शी यांनी ट्रॅक्टर चालक लक्ष्मण निवृत्ती जगताप यांचे विरुद्ध वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .