आतापर्यंत जिह्यात 8 लाख लाखांहून अधिक जणांचे लसीकरण; आमदार, खासदार, पालकमंत्र्यांचे सोलापूरकडे दुर्लक्ष
दोन दिवसाआड 10 ते 20 हजारपर्यंत येतेय लस
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहर जिह्याची लोकसंख्या 45 लाख असून आतापर्यंत केवळ साडे लाखाहुन अधिक जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. पुणे, कोल्हापूर, मुबंई सारख्या शहरात लसीचा सुरळीत पुरवठा होतो मात्र सोलापूर जिह्याला अद्यापही मागणी एवढ्या लसीचे डोस उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे सर्वात कमी लसीकरण सोलापूर जिह्यात झाले आहे. पालकमंत्री भरणे, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप होत आहे.
सोलापूर जिह्यात पंचेचाळीस लाखाहून अधिक लोकसंख्या आहे. मात्र जिह्यासाठी केवळ साडे आठ लाख हजार लस प्राप्त झाल्या असून पूर्ण लसीकरण झाले आहे. 16 जानेवारी 2021 रोजी पहिल्या टप्प्यात फ्रन्टलाइन वर्कर लसीकरण झाले, दुसऱया टप्प्यात 60 वर्षावरील, तिसऱया टप्प्यात 45 वर्षावरील पुढील आणि चौथ्या टप्प्यात 18 ते 24 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.मात्र आता तिसऱया लाटेची शक्मयता वर्तवली यामुळे नागरिक लसीकरणासाठी स्वतःहून पुढे आले आहेत. मात्र शहर व जिह्यात लसीचा तुटवडा निर्माण होत आहे. दोन दिवसावर लसीकरण होत आहे. मागणी पाच ते सहा लाख असते मात्र वीस हजार पर्यंत लसीचा डोस मिळत आहे. त्यामुळे 45 लोकसंख्येत केवळ आतापर्यंत आठ लाख नागरिकांना लसीकरण झाले आहे.
जिह्याची संख्या जास्त असूनसुद्धा लसी कमी मिळाले आहेत. मागील महिन्यात लस नसल्यामुळे कित्येक आरोग्य केंद्र बंद होती. आताही दोन दिवसाआड लस मिळत आहे, नागरिकांना विनाकारण हेलपाटे मारावे लागत होते. लस नसल्यामुळे कमी प्रमाणात लसीकरण झाले आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लसी उपलब्ध करून जास्तीत जास्त जिह्यात लसीकरण करून घ्यावे अशीच मागणी आता सोलापुरातील नागरिककडून होत आहे.
आता लसीचा पुरवठा होईल
सोलापूर जिह्यात लसीचा तुटवडा आहे. मात्र मी शासनाकडे पाठपुरावा करीत असून आता यापुढे लसीचा पुरवठा सुरळीत होईल.
– जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
लसीची मागणी नाही करत
पूर्वी लसीसाठी आम्ही पाच ते सहा लाख लसीची मागणी करीत होतो. मात्र आता मागणीच करणे बंद केले आहे. केंद्राने राज्याला लस दिल्यास राज्याकडून जितके लस सोलापुरात तितके लस नागरिकांना देतो.यापुढे लसीकरण सुरळीत होईल.
डॉ.अनिरुद्ध पिंपळे, लसीकरण समन्यवयक
लसीकरण झालेली माहिती
विभाग प्रथम डोस, दुसरा डोस
फ्रन्टलाइन 77528 30997
हेल्थ वर्कर। 42062 27009
45 पेक्षा जास्त 234234 68445
60 पेक्षा अधिक वय 210628 79513
18 ते 40 वयोगटातील 103345 10126
एकूण 667797 216390
—/////////////——- —
कोट
पाहिला डोस दुसरा डोस एकूण
ग्रामीण 450299 149887 597420
शहर 217498 66503 284001
एकूण 667797 216390 884187
—–///////——–
कोट
वाटप लस – कोव्हिडशिल्ड 805530, वाटप-804540, शिल्लक-990 (एका लसीत 12 जणाना लस दिली,)
– कोवाक्सनि-33550 लस प्राप्त, वाटप-31050, शिल्लक-2500
वेस्टेज लस- -1.22