तरुण भारत संवाद प्रतिनिधी / वैराग
शिवक्रांती युवा संघटन व जिव्हाळा प्रतिष्ठान यांचे मार्फत बार्शी तालुक्यातील 108 रुग्णवाहिकेवरील सर्व चालकांचा कोरोना सुपर हिरोज म्हणून सन्मान करण्यात आला.
शिवक्रांती युवा संघटन व जिव्हाळा प्रतिष्ठानाचे अध्यक्ष श्रीयुत बुरगुटे, सर्व पदाधिकारी, तसेच बार्शी वकील असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. काकासाहेब गुंड, जगदाळे, तसेच इतर मान्यवर यांचे उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये, वैराग, बार्शी व आगळगाव येथील रुग्णवाहिका कोरोनासाठी राखीव आहेत. यामधील चालक प्रकाश गुंजाळ, बाबासाहेब स्वामी, बार्शी गणेश काळे, तानाजी जाधव, करण जाधव, प्रफुल्ल कदम यांचा सन्मान करण्यात आला.
गेली 6 महिन्याचे काळात कोविड 19 संसर्गामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्र भर 108 च्या जवळपास 1000 रुग्णवाहिका यांनी यामध्ये योगदान दिले. जनसेवा व देशसेवा करण्याची संधी चालकांना मिळाली.
गेली 6 महिने हे सर्व चालक कुटुंबापासून जास्तीत जास्त लांब राहून त्यांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला, व रुग्णसेवा देत गेले, आज या सन्मानाने आम्ही केलेल्या कामाचे चीज झाले व कोणीतरी आमच्या ही भावनांचा कुटुंबाचा विचार करते असे जाणवले, आमचे हे कार्य अविरत चालू राहिल याची आपणास खात्री देतो, पुनश्च एकदा आपले आम्ही सर्व ड्रायव्हर व BVG ग्रुप मार्फत आभार मानतो. असे चालकांनी प्रतिक्रिया दिली.