प्रतिनिधी / वैराग
माझ्या शेतातून वाळू उपसा का करता असे विचारणार्या शेतकऱ्यालाच वाळू तस्करांनी खोऱ्याच्या दांड्याने जोरदार मारहाण करून जखमी केल्याची घटना पिंपरी (ता बार्शी )येथे रविवारी दुपारी दोन वाजता घडली असून यासंदर्भात चौघा जणांच्या विरोधात वैराग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत वैराग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संभाजी शहाजी पाटील यांची भोगावती नदी पात्रा शेजारी गट नं १६५ ची शेतजमिन आहे. त्या जमिनी समोरच वाळू उपसा सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी गावातीलच चैतन्य जयकुमार काशीद, शिवशंकर बाळासाहेब पाटील,बाळासाहेब नामदेव पाटील,किशोर बाळासाहेब काशीद यांना माझ्या शेतातून वाळू का उपसता असा जाब विचारला, त्यामुळे त्यांनी चिडून जाऊन खोऱ्याच्या दांड्याने शिवीगाळ करीत मारहाण केली व अंगावर ट्रॅक्टर घालून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी चैतन्य जयकुमार काशीद ,शिवशंकर बाळासाहेब पाटील,बाळासाहेब नामदेव पाटील
किशोर बाळासाहेब काशीद या चौघांच्या विरोधात वैराग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर हे करीत आहेत.