सोलापूर / प्रतिनिधी
सोलपूर शहर पोलीस दलातील पोलीस शिपाई ते सहायक फौजदार दर्जाच्या 325 जणांच्या अंतर्गत बदल्या पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केल्या आहेत.
कोरोना संकटामुळे यंदा पोलिसांच्या बदल्या होणार की नाहीत अशी चर्चा सुरु असतानाच सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बदल्या करण्यात आहेत. फौजदार चावडी, जेलरोड, सदर बझार, विजापूर नाका, सलगरवस्ती, एमआयडीसी, जोडभावी पेठ या सात पोलीस ठाण्यांसह शहर गुन्हे शाखा, विशेष शाखा, अतिक्रमण विभाग, बॉम्बशोधक नाशक, क्युआरटी, पोलीस मुुख्यालय आदी विभागांमध्ये अंतर्गत बदल्या झाल्या आहेत.
ज्या पोलीस कर्मचार्यांचा एकाच पोलीस ठाण्यातील कालावधी पूूर्ण झाला आहे त्यांच्या तसेच विनंतीवरुन पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 22 सहायक फौजदार, 66 पोलीस हवालदार, 64 पोलीस नाईक, 78 पोलीस शिपाई, 33 चालक पोलीस हवालदार यांच्यासह 325 पोलीस कर्मचार्यांचा समावेश आहे. पोलीस कर्मचार्यांच्या बदल्यानंतर पोलीस अधिकार्यांच्या बदल्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.