तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर ग्रामीण भागात तब्बल 340 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, 13 रुग्णांचा मृत्यू झाला. शहरात 70 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. शहर आणि जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 19 हजार 733 झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी तब्बल 340 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 109 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी शुक्रवारी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी 2937 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 340 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 2597 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 340 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 207 पुरुष आणि 133 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12848 झाली आहे.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती ः 100789
ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती ः 12848
प्राप्त तपासणी अहवाल ः 100660
प्रलंबित तपासणी अहवाल ः 129
निगेटिव्ह अहवाल ः 87811
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या ः 373
रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या ः 3485
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या ः 8991
शहरात 118 रुग्ण कोरोनामुक्त, 70 नवे कोरोना पॉझिटीव्ह
सोलापूर शहरातील शुक्रवारी उपचार घेऊन बरे झालेल्या 118 रुग्णांना घरी सोडण्यात आले, तर नवे 70 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी दिली.
सोलापूर शहरात शुक्रवारी 1257 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 70 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 1186 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 70 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 42 पुरुष तर 28 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6885 झाली आहे.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती ः 67697
शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती ः 6885
प्राप्त तपासणी अहवाल ः 67513
प्रलंबित तपासणी अहवाल ः 184
निगेटिव्ह अहवाल ः 60628
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या ः 425
रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या ः 619
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या ः 5841