मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांची माहिती
बरे झाल्याने तब्बल 312 रुग्णांना सोडले घरी, उपचारा दरम्यान 4 जणांचा मृत्यू
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापुर शहारात शनिवारी 96 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. बरे झाल्याने तब्बल 312 जणांना घरी सोडण्यात आले, तर उपचारादरम्यान 4 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी शनिवारी दिली.
सोलापुर शहरात शनिवारी 1147 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 96 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 1051 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 96 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 60 पुरुष तर 36 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4401 झाली आहे. तसेच उपचारादरम्यान 1 जणांचा मृत्यू झाला.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 25194
शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 4401
प्राप्त तपासणी अहवाल : 24740
प्रलंबित तपासणी अहवाल : 454
निगेटिव्ह अहवाल : 20339
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 342
रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 1261
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 2798