प्रतिनिधी / करमाळा
करमाळा तालूक्यातील ५ टी.एमसी क्षमता असलेला सीना कोळेगाव धरण हे १०० टक्के भरले आहे. सततच्या दुष्काळामुळे निराश झालेल्या शेतकऱ्यामध्ये या वर्षी दमदार पाऊस होऊन धरण भरल्याने करमाळा व परंडा तालुक्यातील शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
गततीन वर्षापासुन सिना कोळेगाव धरण लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण नगन्य होत असल्याने धरणात अल्प पाणीसाठा होत होता. मात्र या वर्षी सर्वदूर पाऊस बरसल्याने धरणात येणा-या सिना नदीसह इतर नद्या व ओढे वाहाते झाल्याने सीना कोळेगाव धरण क्षेत्रात या पाण्याचा विसर्ग पोहचल्याने धरण आज दि 28 सप्टेंबर रोजी १०० टक्के भरले असून लाभ क्षेत्रातील शेतक-याचा आनंद द्वीगुनीत झाला आहे.
परांडा पाटबंधारे विभागाने आज जाहीर केले आहे. त्यानुसार आज पहाटे पाच वाजता धरणातील दोन दरवाजे उघडले असून, ते पाणी सीना नदीतून सोडले आहे. सीना कोळगाव धरण भरल्याने या परिसरातील नागरीकांनी आनंद व्यक्त केला आहे. धरणातील पाणी सीना नदीतून २५६७ क्युसेसने त्याचा विसर्ग सुरू आहे. सीना कोळगाव प्रकल्प २८/९/२०२१, सकाळी ७.०० वा. एकूण पाणीसाठा – १५० द.ल.घ.मी. आज रोजी पाणीसाठा-१५०द.ल.घ.मी. मृत पाणीसाठा -६१ द.ल.घ.मी. जिवंत पाणीसाठा-८९ द.ल.घ.मी. टक्केवारी-१०० टक्के २५६७ ने विसर्ग सुरू.