अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा दावा : इराणवरील हल्ल्याचे जोरदार समर्थन
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
इराणचा वरिष्ठ लष्करी कमांडर कासिम सोलेमानला संपवण्याच्या निर्णयाचे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जोरदार समर्थन केले आहे. तसेच त्याच्या कृतीबाबत अनेक गौप्यस्फोटही त्यांनी केले आहेत. कासिम सोलेमानीने अनेक निरपराध लोकांची हत्या केली होती. तसेच नवी दिल्लीपासून ते लंडनपर्यंत विविध ठिकाणी दहशतवादी हल्ल्याचे कट रचण्यात त्याचा सहभाग होता असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
कासिम सोलेमानीच्या मृत्यूने दहशतीच्या राजवटीचा अंत झाला आहे असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच त्याच्या दहशतीचा शेवट झाला असून अत्याचाराला बळी ठरलेल्या लोकांना आज न्याय मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या 20 वर्षांपासून मध्य आशियामध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी सोलेमानी दहशतवादी कारवाया करत होता असा आरोप त्यांनी केला. अमेरिकेने आत्ता केलेली कारवाई यापूर्वीच व्हायला हवी होती असे सांगत त्याने अमेरिकेच्या राजनैतिक आणि लष्करी अधिकाऱयांवर हल्ल्याचे षड्यंत्र रचले होते. तसेच लंडनसह अनेक देशांमधील मोठी शहरेही त्याच्या टार्गेटवर होती, असे ट्रम्प म्हणाले.
इराकवर हवाई हल्ले सुरूच; 6 ठार
अमेरिकेने सलग दुसऱया दिवशी इराकवर हवाई हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी बगदादजवळील ताजी रोजनजीक हा अमेरिकन हवाई दलाच्या विमानांनी हवाई हल्ले सुरूच ठेवले. या हवाई हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला. हल्ले झालेल्या भागात ब्रिटन आणि इटलीच्या सैन्याचे तळ असून ते पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे. इराकमधील सरकारी माध्यमांनी हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नव्याने झालेल्या हवाई हल्ल्यात दोन गाडय़ांवर निशाणा साधण्यात आला. या गाडय़ांमध्ये इराण समर्थक मिलिशिया हश्द अल-शाबीचे काही लोक असल्याचे समजते.
पश्चिम आशियात तणावाची शक्मयता
गेल्या वर्षापासून अमेरिका आणि इराणमध्ये प्रचंड तणाव आहे. अमेरिकेने इराणवर अनेक निर्बंध आणले आहेत. या हल्ल्यानंतर पश्चिम आशियात तणाव वाढण्याची शक्मयता व्यक्त होत आहे. बगदादमधील अमेरिकन दुतावासावर झालेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशातील वाद अधिकच उफाळला असून या घटनांनंतर आता तणाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.