नव्याने 672 पॉझिटिव्ह : 304 जणांची प्रकृती चिंताजनक : सक्रिय रुग्णसंख्या 5,537
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोनाचा कहर सुरूच असून बुधवारी तर कोरोनाचा विस्फोट झाला. एका दिवसात तब्बल 672 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. आतापर्यंतची ही एका दिवसात रुग्ण आढळण्याची उच्चांकी संख्या आहे. रुग्ण वाढीबरोबरच कोरोनाने मृत्यूही एका दिवसात 15 झाले असून एका 16 वर्षीय मुलीसह सात रुग्ण हे 60 वर्षांच्या आतील आहेत.
कोरोना रुग्णवाढ वेगाने होत असून बाधित रुग्णांची एकूण संख्या 18 हजार 239 झाली आहे. तर 232 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत जिल्हय़ात एकूण 12 हजार 261 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सक्रिय रुग्ण संख्या 5 हजार 537 वर गेली आहे.
304 रुग्णांची प्रकृती चिंताजनक
जिल्हय़ातील पॉझिटिव्ह रुग्णांमधील 304 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून त्यातील 266 रुग्ण ऑक्सिजनवर, तर 38 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
जिल्हय़ातील सद्यस्थिती : बुधवारचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण एकूण 672, एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 18,239. सद्यस्थितीतील एकूण सक्रिय रुग्ण 5,537, सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्हय़ाबाहेर गेलेले रुग्ण सहा, बरे झालेले रुग्ण बुधवारी 232, तर आतापर्यंत 12,261. मृत झालेले रुग्ण बुधवारी 15, तर आतापर्यंत 435.
देवगड तालुक्यात सर्वाधिक 139 रुग्ण
तालुकानिहाय मंगळवारी पॉझिटिव्ह रुग्ण : देवगड – 139, दोडामार्ग – 42, कणकवली – 81, कुडाळ – 108, मालवण – 84, सावंतवाडी – 126, वैभववाडी – 15, वेंगुर्ले – 67, जिल्हय़ाबाहेरील – दोन.
तालुकानिहाय आजपर्यंत मिळालेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण : देवगड – 2072, दोडामार्ग – 1094, कणकवली – 4016, कुडाळ – 3552, मालवण – 2148, सावंतवाडी – 2666, वैभववाडी – 982, वेंगुर्ले – 1587, जिल्हय़ाबाहेरील रुग्ण – 122.
तालुकानिहाय सक्रिय रुग्ण : देवगड – 838, दोडामार्ग – 415, कणकवली – 741, कुडाळ – 1005, मालवण – 855, सावंतवाडी – 861, वैभववाडी – 165, वेंगुर्ले – 587, जिल्हय़ाबाहेरील – 70.
तालुकानिहाय आजपर्यंतचे एकूण मृत्यू : देवगड – 50, दोडामार्ग – 12, कणकवली – 94, कुडाळ – 71, मालवण – 61, सावंतवाडी – 75, वैभववाडी – 39, वेंगुर्ले – 31, जिल्हय़ाबाहेरील रुग्ण – दोन.
आरटीपीसीआर आणि ट्रुनॅटटेस्ट टेस्ट रिपोर्टस्: तपासलेले नमुने बुधवारी 1,182, एकूण 79 हजार 280, पॉझिटिव्ह आलेले नमुने 13,526.
ऍन्टिजन टेस्ट तपासलेले नमुने : बुधवारी 1,166. एकूण 38 हजार 853. पैकी पॉझिटिव्ह 4,752.
जिल्हय़ात आणखी 15 जणांचा मृत्यू
जिल्हय़ात आणखी 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामध्ये मालवण येथील 47 वर्षीय महिला, वेंगुर्ले-परुळे येथील 56 वर्षीय पुरुष, कुडाळ-डिगस येथील 75 वर्षीय पुरुष, देवगड-वळिवंडे येथील 70 वर्षीय महिला, मालवण-बेलाचीवाडी येथील 16 वर्षीय महिला, कणकवली-नाटळ येथील 62 वर्षीय पुरुष, सावंतवाडी-बांदा येथील 34 वर्षीय पुरुष, कुडाळ-पिंगुळी येथील 40 वर्षीय पुरुष, सावंतवाडी येथील 81 वर्षीय महिला, वेंगुर्ले-उभादांडा येथील 75 वर्षीय महिला, कुडाळ-ओरोस येथील 42 वर्षीय पुरुष, कणकवली-वागदे येथील 72 वर्षीय पुरुष, वेंगुर्ले-उभादांडा येथील 65 वर्षीय पुरुष, सावंतवाडी-माजगाव येथील 54 वर्षीय पुरुष, कुडाळ-आकेरी येथील 72 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.