ऑनलाईन टीम / दुबई :
सौदी अरेबियाने अल्पवयीन गुन्हेगारांना फाशीची शिक्षा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तसेच सौदी अरेबियाने सार्वजनिकपणे चाबकाची शिक्षा देखील रद्द केली आली.
मानवाधिकारांवरील सौदी अरेबियाची प्रतिमा आतापर्यंत खराब आहे. गेल्या काही वर्षांपासून सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान देशाची प्रतिमा सुधारण्यासाठी सतत सुधारणावादी पावले उचलत आहेत.
सौदी अरेबियाच्या रॉयल डिक्रीचा संदर्भ देताना मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष अवद अलवाड यांनी म्हटलं की, केवळ अल्पवयीन गुन्हेगारांना फाशीची शिक्षा दिली जाणार नाही. फाशीची शिक्षा देण्याऐवजी अल्पवयीन गुन्हेगारांना आता जास्तीत जास्त 10 वर्षे तुरूंगवासाची शिक्षा देण्यात येणार आहे.
तसेच या निर्णयामुळे आता दोषीला जाहीरपणे फटाके मारण्याची सौदी अरेबियातील वादग्रस्त पद्धत आता बंद होईल. राजे सलमान यांच्या आदेशामुळे देशातील शित्ते या अल्पसंख्य समाजातील किमान सहा जणांची मृत्युदंडाची शिक्षा टळणार आहे. या सहा जणांनी ते 18 वर्षाच्या खाली असताना गुन्हे केले होते.
यामध्ये अली अल – निमर याचाही समावेश असून त्याने सरकारविरोधातील निदर्शनात भाग घेतला होता.