ऑनलाईन टीम / मुंबई :
भारतात ‘कोविशिल्ड’ आणि ‘कोवॅक्सिन’नंतर रशियाच्या ‘स्पुतनिक-व्ही’ लसीलाही मान्यता देण्यात आली आहे. ‘स्पुतनिक-व्ही’ लसीच्या दोन खेप भारतात दाखल झाल्या असून, कोविन पोर्टलवर नागरिकांना या लसीचा तिसरा पर्यायही उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
कोविन पोर्टलवरुन लसीकरणासाठी नोंदणी करताना स्लॉट निवडून पिनकोड टाकल्यावर ऑप्शन सर्च करायचा आहे. त्यावेळी ‘स्पुतनिक-व्ही’ लसीचा तिसरा ऑप्शन उपलब्ध होईल. त्यावर क्लिक केल्यास आपल्याला संबंधित रुग्णालयांची यादी उपलब्ध होणार आहे. या लसीचा डोस नागरिकांना जीएसटीसह 995.40 रुपयांना मिळणार आहे.