बेंगळूर/प्रतिनिधी
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध प्रकल्प राबवित भारतात १३ व्या क्रमांकाचे स्थान मिळविणाऱ्या हुबळी-धारवाड स्मार्ट सिटी लिमिटेडने कर्नाटकला अव्वल स्थान मिळवून देत देशातील १०० स्मार्ट शहरांमध्ये समावेश झाला आहे.
हुबळी-धारवाडमधील स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रस्तावित ५७ प्रकल्पांपैकी १० प्रकल्प यापूर्वीच पूर्ण झाले असून ४३ अन्य प्रकल्प अंमलबजावणीच्या विविध टप्प्यात असून चार प्रकल्प आता निविदा प्रक्रियेत प्रगतीपथावर आहेत.
राज्यातील अन्य दोन शहरे ज्यांना पहिल्या २० मध्ये स्थान देण्यात आले असून दावणगेरी १४ आणि तुमकूर १८ व्या क्रमांकावर आहे. दरम्यान कर्नाटक चौथ्या क्रमांकावर आहे.