फक्त मराठी वाहिनी‘ आता दैनंदिन मालिकांच्या माध्यमातूनही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. या दिशेनं मागच्या आठवडय़ात सुरू झालेल्या श्साईबाबा श्रद्धा आणि सबूरीश् या अनोख्या आध्यात्मिक मालिकेला काही दिवसांतच प्रेक्षकांनी आपल्या पसंतीचा कौल दिला आहे. श्फक्त मराठी वाहिनीश्ने नवनव्या कथा कल्पना असलेल्या कलाकृतींच्या निर्मितीचा ध्यास घेतला असून त्यांनी प्रेक्षकांच्या पसंतीनुसार विविध कार्यक्रमांच्या निर्मितीला सुरुवात करीत श्सप्तपदी मी रोज चालते‘ असं शीर्षक असलेली दुसरी दैनंदिन नवी कोरी मालिका येत्या सोमवार, 22 मार्चपासून रात्रौ 8 रू30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीसाठी श्फक्त मराठी वाहिनीश्वर आणली आहे. मालिका आणि चित्रपट क्षेत्रात विशेष लौकिक असलेल्या प्रसिद्ध दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी या श्फक्त मराठी वाहिनीश्च्या प्रोजेक्ट हेड म्हणून कार्यभार पाहत आहेत.
श्सप्तपदी मी रोज चालते‘ या मालिकेत अमफता आणि संजू यांची कहाणी पहायला मिळणार आहे. या दोघांच्या माध्यमातून पवार आणि थोरात या दोन कुटुंबाची कथाही यात आहे. अमफताला आपल्या आईप्रमाणे कर्तबगार आणि वडीलांप्रमाणे समजूतदार पती हवा आहे. कालांतराने तिच्या आयुष्यात संजूची एंट्री होते, पण त्याला काहीही न करता फक्त ऐशोआरामात जीवन जगायचं आहे. अशी ही जोडी भविष्यात श्सप्तपदीश् कशी चालणार या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मालिकेच्या प्रत्येक भागागणिक मिळणार आहे. या मालिकेतील प्रत्येक करॅक्टर वास्तविक जीवनातील खरे खुरे रंग दाखवणारं असल्यानं प्रत्येकाला ही मालिका आपल्याच घरातील कथा सांगणारी असल्यासारखं वाटेल. आज इतर वाहिन्यांवर सुरू असलेल्या कौटुंबिक मालिकांच्या तुलनेत श्सप्तपदीश्मध्ये काहीसं वेगळं कथानक पहायला मिळणार असून, त्यातही अनेक कंगोरे असल्यानं मालिकेत येणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी पुरेसे ठरणारे आहेत. टेलिव्हिजन क्षेत्रातील आघाडीच्या ’टेल अ टेल मीडिया प्रा. लि.‘ या संस्थेच्या जितेंद्र गुप्ता आणि महेश तागडे यांनी श्फक्त मराठी वाहिनीश्साठी या मालिकेची निर्मिती केली आहे.
ऋणानुबंध, मानो या ना मानो, पॅप्टन हाऊस, कलश, कुटुंब, कहानी घर घर की, तीन बहुरानिया, देवयानी, संस्कार धरोहर अपनोंकी अश्या ट्रेंड सेटर लोकप्रिय मालिकांसोबतच धमाधम्म, मितवा, फुगे, लाल इष्क, सविता दामोदर परांजपे, तुला कळणार नाही, माधुरी इत्यादी ग्लॅमरस सुपरहिट मराठी सिनेमांचं यशस्वी दिग्दर्शन करणार्या स्वप्ना वाघमारे जोशी ’सप्तपदी मी रोज चालते‘ या मालिकेसाठी प्रोजेक्ट हेड म्हणून काम पहात आहेत. या मालिकेबाबत स्वप्ना वाघमारे जोशी म्हणाल्या की, ष्श्सप्तपदी मी रोज चालते‘च्या माध्यमातून एक आशयघन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजच्या कुटूंब पध्दतीवर भाष्य करणार्या या मालिकेत एक गुलाबी लोभासवाणी प्रेमकथाही पहायला मिळणार आहे. एक नवी कोरी जोडी या मालिकेचं मुख्य आकर्षण ठरणार आहे. श्फक्त मराठी वाहिनीश्चा मनोरंजनाचा वारसा जपणारी श्सप्तपदी मी रोज चालते‘ प्रेक्षकांना नक्कीच आकर्षित करेल यात शंका नाहीष्.
रिमोटपासून दूर ठेवणारं कथानक, कलाकारांचा सहजसुंदर अभिनय आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांच्या आधारे श्सप्तपदी मी रोज चालते‘ ही मालिका प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी होईल असं मत श्सप्तपदी मी रोज चालते‘चे दिग्दर्शक प्रवीण परब यांनी व्यक्त केलं आहे. या मालिकेत तफप्ती देवरे, बिपीन सुर्वे, विजय मिश्रा, स्नेहा रायकर, अखिल लाले, संजना काळे, प्राप्ती बने, वंदना वाकनीस, विपुल साळुंखे, आरती शिंदे, अमित कल्याणकर, रुपाली गायके, रणजित रणदिवे, चेतन चावडा, श्रुती पारकर, हर्षदा कर्वे, पूजा यादव आदी लाकारांच्या भूमिका आहेत.