नवी दिल्ली
काळय़ा पैशाच्या विरोधात भारत सरकारला लवकरच मोठे यश मिळू शकते. चालू महिन्यात सरकारला स्वीस बँकेतील भारतीय खातेधारकांच्या माहितीचा तिसरा सेट मिळणार आहे. या तपशीलात पहिल्यांदाच अचल मालमत्तांचाही उल्लेख असणार आहे. यात फ्लॅट्स, अपार्टमेंट्स आणि त्यापासून झालेल्या उत्पन्नाचाही उल्लेख असणार आहो. ही माहिती स्वीत्झर्लंडसोबत झालेल्या माहितीच्या आदान-प्रदान कराराच्या अंतर्गत मिळणार आहे.