ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
फ्रेंडशिप डे च्या निमीत्ताने काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. राहूल गांधी यांनी या शुभेच्छा देण्यासाठी एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून “हम दो, हमारे दोनो की सरकार” अशी पोस्ट करत मैत्री दिनाच्या शुभेच्छा राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना खोचक संदेश दिला आहे.
या व्हिडिओमध्ये मोदींसमवेत उद्योगपती गौतम अदानी, मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्यासोबत दिसत आहेत.तसेच एका फोटोत पंतप्रधान मोदी गौतम अदानी यांच्यासोबत विमानात दिसत आहेत. तर मुकेश अंबानी गौतम अदानी यांची गळाभेट घेताना दिसत आहेत. हे सरकार उद्योगपतींचे आहे. असा संदेश राहूल गांधी यांना द्यायचा आहे. हा व्हिडिओ अपलोड होताच काही वेळात चांगलाच व्हायरल झाला आहे. तसेच यावर कमेंटही पडत असून भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी परस्परविरोधी टीका करायला सूरुवात केली आहे.