तरुण भारत पुरवणीचे ग्रामस्थांनी केले कौतुक
औंध /प्रतिनिधी
भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या भूषणगडावरील हरणाईदेवीचा अष्टमीउत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. दै तरुण भारतने प्रसिद्ध केलेल्या पुरवणीचे ग्रामस्थांनी कौतुक केले.
कोरोनाच्या महामारीमुळे यंदा शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करून मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत गडावर अष्टमीउत्सव साजरा करण्यात आला. देवीची पारंपरिक पद्धतीने पूजा करून पालखीत प्रतिष्ठापना करण्यात आल्यानंतर मंदीराभोवती पालखीची प्रदक्षिणा काढण्यात आली. यावेळी हरणाईदेवी देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य देवीचे मानकरी पुजारी उपस्थित होते. गडावर जाणाऱ्या लोकांना युनिक डायगोन्स्टिक डिजिटल एक्सरे सेंटर यांच्या वतीने मास्क सँनिटायझरचे वाटप करण्यात आले. तसेच थर्मल स्क्रिनिंग करून तापमान चाचणी घेण्यात आली.
अष्टमी उत्सवानिमित्त दै तरुण भारतने प्रसिद्ध केलेल्या सचित्र रंगीत पुरवणीचे ग्रामस्थ भाविकांनी कौतुक केले. गडावर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सतिश जाधव जाधव, उपाध्यक्ष जयवंतराव सरनौबत, सचिव धोंडीराम जगताप, विलास शिंदे, अंकुश जाधव, सचिन जाधव, किसन जाधव,सुरेश डोईफोडे मोहनभाऊ देशमुख, मनोज बिटले, प्रतिनिधी फिरोज मुलाणी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.