ऑनलाईन टीम / चंदीगड :
हरियाणामध्ये आज झालेल्या योग परिषदेच्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, हरियाणामधील शालेय शिक्षणात आता योगाचा देखील समवेश केला जाणार आहे. ही माहिती आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी ट्विट करत दिली.
चंदीगड मध्ये बुधवारी योग परिषदेच्या बैठक संपन्न झाली. या बैठकीला मुख्यमंत्री मनोहर लाल व योगगुरू स्वामी रामदेव उपस्थित होते.
अनिल वीज आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, हरियाणामध्ये योग शाळांची संख्या 2000 केली जाणार आहे. महिन्यातील पहिला रविवार योग दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. तसेच योग प्रशिक्षकांची भरती देखील केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.