सकाळी 6 ते 10 पर्यंत व्यवहार सुरू : विनामास्क फिरणाऱयांना 200 रुपये दंड
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना महामारीमुळे सारेच जण हैराण झाले आहेत. वाढता फैलाव लक्षात घेवून अनेक गावांनी स्वयंस्फूर्तीने कडक लॉकडाऊन गावमर्यादीत सुरू केला आहे. त्याचप्रमाणे हलगा गावानेही आठ दिवसांपर्यंत स्वयंस्फूर्तीने सोमवारपासून लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे कोणीही घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन ग्राम पंचायततर्फे केले आहे. नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.
येत्या आठ दिवसांपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे. तसेच मास्क न वापरणाऱयांना 200 रुपये दंड तर वेळ उलटूनही दुकाने सुरू राहिल्यास 1000 रुपये दंड आकारण्यात येणार असून परवाना रद्द करण्यात येणार असल्याचे ग्राम पंचायतीने कळविले आहे.
हलगा ग्राम पंचायतीच्या माध्यमातून लॉकडाऊनबाबत जनजागृती करुन जनतेला कोरोनापासून सावध राहण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे गावपातळीवर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गावात मोटार सायकलफेरी काढून ही जागृती करण्यात आली.
सोमवारी सकाळपासूनच वाहन व पोलिसांच्या सहकाऱयांतून ही जनजागृती करण्यात आली. यावेळी विनाकारण फिरणाऱयांना पोलिसांनी सूचना केल्या. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाबतची जनजागृती ग्राम पंचायतीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. सोमवारपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार पोलीस प्रशासनाने गावात फेरफटका मारुन सर्व व्यवहार बंद करण्याचे आवाहन केले. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.