तीन दिवसीय नाटय़महोत्सवासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम
प्रतिनिधी /पणजे
पेडणे- हसापूर येथील प्रसिद्ध देवस्थान ग्रामदैवत श्री सातेरी – ब्राह्मणी पंचायतन देवस्थानचा 16 वा पुनः प्रतिष्ठापना वर्धापनदिन महासोहळा शनिवार दि 12 ते सोमवार 14 मार्च 2022 रोजी दरम्यान साजरा करण्यात येणार आहे.
सलग तीन दिवस चालणाऱया या सोहळय़ानिमित्त शनिवार दि. 12 मार्च रोजी सकाळी 7 वाजल्यापासून वेदमूर्ती श्रीनिवास मराठे यांच्या अधिपत्याखाली देवीवर सामूहिक पंचामृत अभिषेक, अनुष्ठान आरंभ, गणपती पूजन, पुण्याह वाचन,नवग्रह नवचंडी अनुष्ठानांग देवता स्थापन -पूजन सप्तशती पाठ ग्रहयोग , मातृका पूजन, संभार दान आचार्य वरण प्रकार शुद्धी ,श्री सत्तू विधानांग देवाता स्थापन,अग्नी स्थापन, नवग्रह स्थापन ,श्री सत्तू जपानुष्ठान प्रारंभ पूजन, सप्तशतिजप प्रारंभ आदी धार्मिक कार्यक्रम होतील. दुपारी 1 वाजता महाप्रसाद तर सायंकाळी 4 वा हिंदी मराठी सदाबहार गाण्यांचा ‘गीत गांधार’ हा कराओके कार्यक्रम बाळू गावकर सादर करतील त्यानंतर साय 7 वा. ग्रामस्थांचे सुश्राव्य भजन व रात्री 9.45 वा . सातेरी कलामंदिर हसापूर- गोवा प्रस्तुत व गोविंद नाईक दिग्दर्शित दोन अंकी विलक्षण रहस्यमय नाटक ‘हॅन्ड्स अप’ येथील सातेरी पटांगणातील भव्य रंगमंचावर सादर होईल. वसंत कामत लिखित या नाटकाची पार्श्वसंगीताची बाजू जवाहर बर्वे यांनी तर नेपथ्य चंद्रशेखर बर्वे आणि प्रकाशयोजनेची बाजू उमेश कार्बोटकर यांनी सांभाळली आहे. वेशभूषा श्रुती देसाई, रंगभूषा साजरो शेटगावकर तर साहाय्यक संकल्प नाईक, नितेश नाईक, हर्ष मळीक, विशांत नाईक, चैतन्य गवस आहेत तर ध्वनिसंयोजन प्रवीण च्यारी यांचे आहे. यात गोविंद नाईक, अरविंद नाईक, प्रजय मळीक, सुहास रामकृष्ण मळीक, श्रुती देसाई, अंकिता गवस आणि नीलेश नारायण नाईक यांच्या भूमिका आहेत
रविवार 13 मार्च रोजी सकाळी 7.30 वा अभिषेक, प्राकारशुद्धी, संग्रह श्रीमुक्त हवन, बलिदान पूर्णाहुती अभिषेक, गाऱहाणे, देवता पूजन, क्षेत्रपाळ व् कुष्मांड बळी, पूर्णाहुति, अभिषेक, देवतांकड़े कृपा याचना सांगणे प्रार्थना, तीर्थप्रसाद, ब्राह्मण सन्तपर्ण आदी धार्मिक विधी होतील. दुपारी 1 वा. महाप्रसाद सायं 3. 30 वा. पावणी नंतर ग्रामस्थांचे भजन व तद्नंतर 7 वा. गावातील महिला आणि मुलांची सवेश दिंडी व पालखी मिरवणूक प्रदक्षिणा, दीपोत्सव व रात्री 10 वाजता नादब्रह्म ,सत्तरी प्रस्तुत आणि प्रवीण मराठे प्रोडक्शन निर्मित दोन अंकी विनोदी नाटक ‘असला नवरा नको ग बाई ’ येथील सातेरी पटांगणातील रंगमंचावर सादर होईल. या नाटकाचे लेखन दिग्दर्शन प्रवीण मराठे यांनी केले असून यात निखिल जोशी, संकेत फडके, विनायक भट प्रभू, दीपिक्षा गावकर, रक्षा गिरप, अंकिता गावस आणि प्रवीण मराठे यांच्या प्रमुख भूमिका आहेत तर तांत्रिक बाजू प्रथमेश दामले, उत्कर्ष बर्वे, सोनिया नाईक, रोशन राणे यांनी सांभाळली आहे.
सोमवार 14 मार्च रोजी सकाळी 7. 30 वा अभिषेक 10 वा. सत्यनारायण महापूजा, आरती व तीर्थप्रसाद दुपारी 1 वा. महाप्रसाद, सायं 3 वा. गावातील महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील तर 5. 30 तो 8 या वेळेत प्रसिद्ध निमंत्रित श्री सातेरी प्रासादिक संगीत संस्था महिला भजनी मंडळ ,बेतोडा फोडा यांचा सुश्राव्य भक्तिभाव कार्यक्रम ‘भजन संध्या’ सादर होईल. यात गायक कलाकार श्रुती सालेलकर, हर्षदा सालेलकर, दिव्यता सालेलकर आणि साथी दानिश गावकर, विजय चव्हाण हे भाग घेतील त्यानंतर रात्री 10 वा सातेरी महिला कला-सांस्कृतिक महिला मंडळ ,हसापुर निर्मित यशवंत रंजनकर व अशोक नाईक दिग्दर्शित लिखित तीन अंकी पौराणिक नाटक संगीत ‘अमृत-मोहिनी’ सादर होईल पार्श्वसंगीताची बाजू जवाहर बर्वे यांनी तर नेपथ्य व वेशभूषा, प्रकाशयोजनेची बाजू गुरुप्रसाद रंगमंच, कासारपाल यांनी सांभाळली आहे. रंगभूषा जितेंद्र परब तर संगीतसाथ आनंद नाईक व सुविशांत बोर्डेकर यांनी दिली आहे तर ध्वनिसंयोजन सुभाष शिरोडकर यांचे आहे. यात मुस्कान नाईक, सुखदा नाईक, तेजाली मळीक, दीपाली मळीक, मैथिली नाईक, पल्लवी मळीक, दीपाली वि. मळीक, सूचिता मळीक, रजनी मळीक, मीनल नाईक, अवनी सावंत, नमिता नाईक, शुभांगी देसाई, सुश्मिता मळीक, लतिका नाईक यांच्या भूमिका आहेत. कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहून आयोजित कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान समिती व ग्रामस्थांनी केले आहे.