30 वर्षांपासून ‘देवा’ची देखभाल करताहेत 88 वर्षीय वाँग
88 वर्षीय वाँग पिंग पोंग मागील 30 वर्षांपासून ‘देवा’ची देखभाल करत आहेत. हाँगकाँगचा वॉटरफॉल बे पार्क त्यांचे ठिकाण आहे. तेथे भगवान बुद्ध, हाँगकाँगच्या पुज्यनीय ताओ समवेत अनेक धर्मांच्या देवतांच्या मूर्ती आहेत. पिंग पोंग त्यांची देखरेख करतात.
हे उद्यान देवांसाठी निवृत्तिगृहाप्रमाणेच आहे. येथे लोक जुन्या आणि तुटलेल्या मूर्ती ठेवून जातात अशी माहिती वाँग यांनी दिली. या ठिकाणाला स्काय फुल ऑफ गॉड्स अँड बुद्ध नाव देण्यात आले आहे.
3 हजारांपेक्षा अधिक मूर्ती
उद्यानात सुमारे 3 हजार मूर्ती असून यातील काही 3 दशकांपेक्षा अधिक जुन्या आहेत. हाँगकाँगमधील लोक मूर्ती तुटणे किंवा त्याचा रंग उतरणे दुदैवी संकेत असल्याचे मानतात. घरात समृद्धी यावी याकरता लोक देवांच्या मूर्ती घरात आणतात. पण जेव्हा त्या बाहेर फेकल्या जातात, तेव्हा समृद्धीही बाहेर सोडून येतात. यापेक्षा या मूर्ती येथे आणणे बेहत्तर असे वाँग यांचे मानणे आहे.
भगवान बुद्धांचा आशीर्वाद
अत्यंत कमी वयापासूनच भगवान बुद्ध याच्या आशीर्वादामुळे देवतांची देखभाल करत आहे. मी असे नाही केल तर मग कोण करणार? मी या मूर्तीना विखुरलेले पाहू शकणार नसल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.
दिवसातून दोनदा उद्यानवारी
मूर्ती ठेवलेल्या उद्यानात वाँग दिवसातून दोनवेळा पोहोचतात. सकाळी 8 वाजता आणि दुपारनंतर ते येथे येत असतात. वाँग सर्वप्रथम मूर्तींची सफाई करतात. तुटलेल्या मूर्ती जोडण्याचा प्रयत्न करतात. असे केल्यावर देवही माझी देखभाल करेल आणि त्याचा आशीर्वाद कायम राहणार असल्याचे वाँग यांचे मानणे आहे.
अत्यंत पवित्र ठिकाण
हे अत्यंत पवित्र स्थान असल्याचे वाँग यांचे म्हणणे आहे. फेंगुशईचे तज्ञही हा हिस्सा टेकडी आणि समुद्राच्या समोरच्या बाजूने असल्याचे आणि हे अत्यंत शुभ असल्याचे सांगतात. याचमुळे मी अशा ठिकाणी वेळ घालवावा अशी देवाची इच्छा असावी असे वाँग यांनी म्हटले आहे.