हातकणंगले / प्रतिनीधी
हातकणंगले तालुक्यातील मुदत संपणाऱ्या २१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. ग्रामविकासाचा कणा माणल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत सभागृहातमध्ये प्रतिनीधीत्व करण्यासाठी २१ गावांत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय पक्षांपेक्षा स्थानिक राजकीय गटांना या निवडणूकीत विषेश महत्व दिले जाते. त्यामुळे गावा गावांत राजकीय चर्चा चांगल्याच रंगत आहेत.
आज अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी तालुक्यातील माणगांव मधुन सर्वाधीक २६ अर्ज दाखल झाले आहेत तर कबणुर ( ६ ) , कुंभोज ०२ ) ,नेज (०५ ) , किणी ( ३ ) , वाठार तर्फ वडगांव ( ०२ ), पाडळी ( ४ ) , मनपाडळे ( ०१ ) , रुई ( ०२ ) असे एकूण ५२ अर्ज आज निवडणूक विभागाकडे प्राप्त झाले आहेत.