हातकणंगले / प्रतिनिधी
अखंड हिंदुस्थानचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर समाजकंटकांनी शाई मारून विटंबना केल्याच्या निषेधार्थ हातकणंगले तालुका सकल मराठा समाज समन्वय समितीच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला.
हातकणंगले येथील एसटी स्टँड समोरील मुख्य चौकात विटंबना करणाऱ्या समाजकंटकांचा पुतळा जाळण्यात आला.कर्नाटक सरकारचा निषेध असो,छत्रपती शिवाजी महाराज की जय,विटंबना करणाऱ्या समाजकंटकांच्या धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या.पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी हातकणंगले पंचायत समितीचे माजी उपसभापती दीपक वाडकर,समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा.रवींद्र पाटील,दीपक कुन्नुरे,नगरसेवक दीनानाथ मोरे,अभिजीत लुगडे,रमेश पाटील, पुंडलिक बिरंजे,अमित गर्जे,माजी उपसरपंच चंद्रकांत जाधव,शशिकांत वाळके,कृष्णात जाधव, विजय जाधव,मंगेश नरुटे,तानाजी वरुटे,प्रशांत कदम,अक्षय लोंढे,गोट्या निंबाळकर,संदीप वाळके,सोमेश भोसले,बंडू मोरे आदी हातकणंगले तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.