अश्वाला बेशुद्ध करणाऱया औषधाचे सेवन
अमेरिकेत आना एक नव्या प्रकारचा नशा (अमली पदार्थांचे सेवन) वेगाने फैलावत आहे. अमेरिकेत रस्त्यांवर आणि सहजपणे मिळणाऱया अमली पदार्थांना स्ट्रीट ड्रग्स म्हटले जाते. या स्ट्रीट ड्रग्समध्ये आता अश्वांना बेशुद्ध करण्यासाठी वापरल्या जाणाऱया औषधाचाही समावेश झाला आहे. या औषधाने घातक ओपिऑयड ड्रग्सच्या शेणीचा एक तृतीयांश हिस्सा पटकाविला आहे.
अमेरिकेच्या फिलाडेल्फियामध्ये करण्यात आलेल्या एका अध्ययनात याचा खुलासा झाला आहे. अश्वाला बेशुद्ध करणाऱया औषधाचा वापर आता अमली पदार्थ म्हणून केला जात आहे. जाइलाजिन असे नाव असलेले हे औषध ओपिऑयड ड्रग नाही. पण याचा वापर ओफियम म्हणजेच अफूने तयार होणाऱया औषधांसोबत मिळून केला जात आहे.
अमली पदार्थांच्या अतिरेकामुळे मृत्यू झालेल्या अनेकांचे शवविच्छेदन करण्यात आले होते. याविषयीच्या अध्ययनात मागील एक दशकात फिलाडेल्फियामध्ये जाइलाजिन आणि ओपिऑयड ड्रगच्या मिश्रणामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या औषधाच्या वापरावरील देखरेख वाढविण्याची मागणी आता संशोधक करत आहेत.
अध्ययनानुसार सध्या अमेरिकेत ओफिऑयड ड्रग्सची महामारी सुरू आहे. जाइलाजिनच्या अतिरेकामुळे मृत्यू झाल्याचे उघड होत नाही कारण, अमेरिकेच्या अनेक प्रयोगशाळांमध्ये याची चाचणीच होत नाही. जाइलाजिनचा वापर अमेरिकेत प्राण्यांना बेशुद्ध करण्यासाठी केला जातो. अमेरिकेत माणसांवरील याच्या वापरावर बंदी आहे. हे औषध माणसाचा रक्तदाब कमी करते, तसेच हृदयाच्या ठोक्यांचा वेगही मंदावते.