वार्ताहर /हिंडलगा
हिंडलगा ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक झाल्यानंतर लागलीच हिंडलगा तसेच विजयनगर व लक्ष्मीनगर भागातील विकासकामांना जोरदार सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जवळपास 130 रस्त्यांचे काम पूर्ण झाले असून आता पुन्हा रविवार दि. 27 पासून 161 नवीन गटारी कामांना सुरुवात करण्यात आली आहे.
साईमंदिर विजयनगर वॉर्ड नं. 7 व 8 पासून सदर कामाचा शुभारंभ करण्यात आला. हिंडलगा ग्रा. पं. अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांच्या प्रयत्नातून सर्व रस्ते व गटारी कामाला तसेच विविध विकासकामांना चालना मिळत आहे.
याप्रसंगी वॉर्ड सदस्य निर्मलकुमार धाडवे, मिथून उसुलकर, लता उसुलकर व ओमकार हळदणकर यांच्या हस्ते हार व श्रीफळ वाढवून गटार कामाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी ग्रा. पं. अध्यक्ष नागेश मन्नोळकर, उपाध्यक्ष भाग्यश्री कोकितकर, ग्रा. पं. माजी अध्यक्ष व सदस्य रामचंद्र मन्नोळकर, लक्ष्मी परमेकर, आरती कडोलकर, नामदेव पाटील, संगीता पलंगे, रेणू गावडे, सुमन राजगोळकर, कॉन्ट्रक्टर गजानन अष्टेकर, नरेंद्र खांडेकर, रमेश कडोलकर, संतोष पिले, प्रभाकर पुजारी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.