ऑनलाईन टीम/तरुण भारत
इस्लाममध्ये हिजाब परिधान करणे ही धार्मिक प्रथा नाही, असा निर्वाळा देत कर्नाटक उच्च न्यायालयाने शिक्षण संस्थांमधील हिजाबबंदी वैध असल्याचा निकाल मंगळवारी दिला. या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये तातडीने सुनावणी करण्याची याचिका दाखल करण्यात आलीय. ज्येष्ठ वकील संजय हेगडे यांनी ही याचिका दाखल केलीय. सर्वोच्च न्यायालयाने या निकालासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर भाष्यही केलंय. हेगडे यांनी दाखल केलेली याचिकेपूर्वीच काही मुस्लीम विद्यार्थिनींनी सर्वोच्च न्यायालयात कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे. हा निकाल घटनाविरोधी असल्याचा दावा ‘कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया’ या विद्यार्थी संघटनेने केलाय.
दरम्यान, कर्नाटक सरकारने शिक्षणसंस्थांसाठी केलेला हिजाबबंदीचा निर्णय योग्यच असून शिक्षणसंस्थांनी विद्यार्थ्यांसाठी निर्धारित केलेल्या गणवेशाला कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही, असा महत्वपूर्ण निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. हिजाबचा उपयोग हा इस्लाम धर्माचा अत्यावश्यक भाग नाही, असेही मुख्य न्यायाधीश रितुराज अवस्थी, न्या. कृष्ण आणि न्या. काझी यांच्या घटनापीठाने एकमुखाने स्पष्ट केले.
हा निकाल घटनाविरोधी असल्याचा दावा ‘कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया’ या विद्यार्थी संघटनेने केलाय. दरम्यान, “या सर्व याचिका सुनावणीसाठी न्यायालयाच्या पटलावर आणण्यासंदर्भात होळीच्या सुट्टीनंतर निर्णय घेतली जाईल,” असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय.