प्रतिनिधी/ बेळगाव
हिडकल जलाशयामधून जादाचे पाणी उपसा करण्याकरिता नवीन विद्युप पंप बसविण्यासह जलवाहिन्या बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. शनिवारी सायंकाळी हिडकल जलाशय जॅकवेलमधील एक विद्युत पंप सुरू करून चाचणी करण्यात आली. त्यामुळे रविवारीही शहरातील पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. पण मंगळवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्मयता आहे.
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी हिडकल जलाशयामधून जादाचा पाणी उपसा करण्याकरिता विद्युत पंप बदलण्याचे काम हाती घेण्यात आले होते. परिणामी दि. 3 पासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. दि. 6 पासून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार होता. पण पंप आणि जलवाहिन्या बसविण्याचे काम लांबल्याने आणखी दोन दिवस पाणी पुरवठय़ात व्यत्यय निर्माण झाला होता. रविवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी अपेक्षा होती. पण शनिवारी सायंकाळी काम पूर्ण झाल्यानंतर पंप सुरू करून चाचणी करण्यात आली. रविवारपासून एक पंप सुरू करून पाणीपुरवठा करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. जलवाहिन्यांच्या गळत्या निवारणासाठी जलवाहिन्या पूर्णपणे रिकामी करण्यात आल्याने पाणी भरण्यास विलंब लागला. त्यामुळे रविवारी सुरळीत पाणीपुरवठा झाला नाही. मात्र, मंगळवारपासून सुरळीत पाणीपुरवठा होण्याची शक्मयता आहे. हिडकल जलाशयामधून जादाचा पाणीसाठा उपसा करण्यासाठीचा प्रस्ताव मागील पाच वर्षांपासून रखडला होता. हा प्रस्ताव अखेर मार्गी लागला असून हिडकल जलाशयामधून शहराला आणखी सहा एमजीडी जादाचे पाणी मिळणार आहे.