ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अरुणाचल प्रदेशातील कामेंग सेक्टरमध्ये हिमस्खलन झाल्याने लष्कराचे सात जवान अडकले आहेत. या जवानांना वाचविण्यासाठी लष्कराकडून बचावकार्य हाती घेण्यात आले असून, विशेष पथकेही एअरलिफ्ट करण्यात आली आहेत.
अरुणाचल प्रदेशातील कामेंग सेक्टरच्या उंच भागातील हवामान खराब असून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बर्फवृष्टी होत आहे. या भागात रविवारी लष्कराच्या तुकडीचे सात जवान गस्त घालत होते. हे जवान बेपत्ता झाले असून, ते हिमस्खलनामुळे गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. लष्कराकडून बचावकार्याला वेग आला आहे. विशेष पथके विमानाने घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत.