लाहौल-स्पीती जिल्हय़ात भूकंपाचे धक्के बसले आहेत. हा भूकंप सकाळी 10 वाजून 46 मिनिटाला झाला. या वेळी तेथील लोक आपापल्या दैनंदीन कामात व्यस्थ होते. या भूकंपाचे केंद्र लाहौल-स्पीती असून, याची तीव्रता 5 किलोमीटरपर्यंत पोहोचली होती. भूकंपाची तीव्रता 3.4 रिश्टर प्रमाण इतकी नोंदवली असून, या अगोदर रविवारी 3.7 रिश्टर प्रणाम तीव्रतेचा भूकंप झाला होता.