ऑनलाईन टीम / शिमला :
हिमाचल प्रदेशमध्ये सोमवारी पुन्हा एकदा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. दुपारी 1 वाजून 41 मिनिटांनी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 3.1 रिश्टल स्केल एवढी होती. भूकंपाचे धक्के जाणवल्यावर सर्व लोकं लगेचच घराबाहेर पडली.
मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू चंबा होता. उपायुक्त विवेक भाटिया यांनी सांगितले की, अजून पर्यंत कोणत्याही प्रकारच्या नुकसानाची सूचना मिळाली नाही. याआधी एप्रिल महिन्यात सिलसिलेवार या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर जूनमध्ये देखील एकदा भूकंप जाणवला होता.