हुबळी/प्रतिनिधी
हुबळी येथे असणाऱ्या व्यापाऱ्याचा केरळमधील कासारगोड येथे कोरोनामुळे मृत्य झाला. तो मूळचा केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील होता. कासारगोड जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, हा रुग्ण हुबळी येथे प्रोव्हिजन्स स्टोअर चालवित होता. हुबळीमध्ये असताना त्याला ताप आला आणि ६ जुलैच्या रात्री दोन मित्रांसह कारने केरळला गेला. ७ जुलैला तलापाडी चेकपोस्टवर पोचल्यानंतर त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांनतर त्याला कासरगोड सामान्य रूग्णालयात घेऊन जाताना त्यांचे निधन झाले.
मृत्यूनंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे कासारगोड जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.