वार्ताहर/ हुबळी
मास्क न घालता फिरणाऱयांची कोविड चाचणी करण्याचा आदेश धारवाड जिल्हा प्रशासनाने दिला आहे. त्यानुसार शुक्रवारी हुबळीतील जुने बसस्थानकावर मास्क परिधान न केलेल्या महिलेचे स्वॅब तपासणी करण्यासाठी सरसावलेल्या महिला डॉक्टरवर तीन महिलांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.
मास्क परिधान न केल्याने बसस्थानकावरील महिलांची कोविड चाचणी करण्यासाठी महिला आरोग्य कर्मचाऱयाने पुढाकार घेतला. यावेळी तपासणी करून घेण्यास महिलांनी नकार दिला. तसेच मोबाईल क्रमांक देण्यासही नकार दर्शवत आरोग्य कर्मचाऱयाला मारहाण केली. या प्रकारानंतर तेथे दाखल झालेल्या हुबळी उपनगर पोलिसांनी आरोग्य कर्मचाऱयाला धीर दिला. तसेच हल्ला केलेल्या महिलांना फैलावर घेत ताकिद दिली.