नवी दिल्ली
मारूती सुझुकीच्या नव्या हॅचबॅक गटातील बलेनो कारच्या बुकिंगला सुरूवात झाली असून त्याकरीता इच्छुक ग्राहकांना आगाऊ 11 हजार रुपये भरावे लागणार आहेत.
देशातील आघाडीवरच्या पाच टॉप कारमध्ये बलेनोचा समावेश आहे. आधुनिक सुविधांनी युक्त नवी बलेनो ग्राहकांना नक्कीच पसंत पडणार असल्याचा विश्वास वरिष्ठ कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी व्यक्त केला आहे.