गेल्या वषीच्या तुलनेत बियरचा खप दुप्पट
प्रतिनिधी/ बेळगाव
थर्टी फर्स्ट डिसेंबरच्या पाटर्य़ांत यंदा 12 हजार 435 बॉक्स वेगवेगळय़ा ब्रँडचे मद्य व 11 हजार 771 बॉक्स बियर तळीरामांनी रिचवली आहे. मात्र, गेल्या वषीच्या तुलनेत यंदा मद्याची विक्री खालावली असून बियरची विक्री मात्र दुप्पट झाली आहे.
अबकारी अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीवरून बेळगाव उपविभागात 4 हजार 894 बॉक्स मद्य व 4 हजार 554 बॉक्स बियरची विक्री झाली आहे तर बेळगाव उत्तर जिल्हय़ात 7 हजार 541 बॉक्स मद्य, 7 हजार 721 बॉक्स बियरची विक्री झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादलेल्या निर्बंधांमुळे यंदा खपावर परिणाम झाल्याचे जाणवते.
उपलब्ध माहितीनुसार बेळगाव रेंज 1 मध्ये 954 बॉक्स मद्य व 11 हजार 87 बॉक्स बियर, बेळगाव रेंज 2 मध्ये 1057 बॉक्स मद्य, 1053 बॉक्स बियर, बेळगाव रेंज 3 मध्ये 1197 बॉक्स मद्य, 1138 बॉक्स बियर, खानापूरमध्ये 306 बॉक्स मद्य, 227 बॉक्स बियर, बैलहोंगलमध्ये 368 बॉक्स मद्य, 563 बॉक्स बियर, सौंदत्तीमध्ये 805 बॉक्स मद्य, 333 बॉक्स बियर, रामदुर्गमध्ये 207 बॉक्स मद्य, 53 बॉक्स बियर खपली आहे.
तर बेळगाव उत्तर जिल्हय़ातील चिकोडी तालुक्मयात 695 बॉक्स मद्य, 1171 बॉक्स बियर, गोकाक तालुक्मयात 587 बॉक्स मद्य, 230 बॉक्स बियर, हुक्केरी तालुक्मयात 86 बॉक्स मद्य, 670 बॉक्स बियर, अथणी तालुक्मयात 656 बॉक्स मद्य, 247 बॉक्स बियर, रायबाग तालुक्मयात 623 बॉक्स मद्य, 345 बॉक्स बियर खपली आहे. संपूर्ण जिल्हय़ाची आकडेवारी लक्षात घेता रामदुर्ग तालुक्मयात कमीत कमी मद्य खपल्याचे दिसून येते.
2019 च्या 31 डिसेंबर रोजी जिल्हय़ात 15 हजार 430 बॉक्स मद्य व 6 हजार 919 बॉक्स बियर खपली होती. यंदा हा आकडा 12 हजार 435 बॉक्स मद्य व 11 हजार 771 बॉक्स बियर इतका आहे. यावरून गेल्यावषीपेक्षा मद्यविक्रीत घट झाली असून बियर विक्री मात्र दुप्पट झाल्याचे दिसून येते. केवळ एका दिवसाची ही आकडेवारी आहे.