वृत्तसंस्था/ हॅम्बुर्ग
डब्ल्यूटीए टूरवरील येथे शनिवारी झालेल्या हॅम्बुर्ग युरोपियन महिलांच्या खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या बर्नार्डा पेराने एकेरीचे विजेतेपद पटकाविताना टॉप सिडेड कोंटावेटचा सरळ सेट्समध्ये पराभव केला.
या स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात पेराने कोंटावेटचे आव्हान 6-2, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये संपुष्टात आणले. डब्ल्यूटीए टूर स्पर्धेतील पेराचे हे दुसरे विजेतेपद आहे. या स्पर्धेत पेराने नवव्या मानांकित विद्यमान विजेत्या इलिना रुसेचा 6-0, 6-4 असा पराभव करत जेतेपदापर्यंत मजल मारली. अंतिम सामन्यात पेराने कोंटावेटचे आव्हान 74 मिनिटात संपुष्टात आणले.