प्रतिनिधी / बेंगळूर
आयएमए ज्वेलर्स व समूहाने फसवणूक केल्याच्या प्रकरणासंबंधी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांच्याविरुद्ध सीबीआयने दाखल केलेले चार्जशिट उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे या प्रकरणात हेमंत निंबाळकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अधिक व्याज देण्याच्या आमिषाने हजारो गुंतवणूकदारांना बेंगळूरमधील आयएमए समुहाने गंडा घातला होता. हे प्रकरण उघड होण्यापूर्वीच रिझर्व्ह बँकेने चौकशी करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार तपास अधिकाऱयांनी चौकशी करून आयएमए समुहाकडून कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचा अहवाल सादर केला होता. हा अहवाल सादर करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात लाच घेण्यात आल्याचा अनेकांवर आरोप झाला होता.
फसवणूक प्रकरण उघड झाल्यानंतर सीबीआयने तपास करून चार्जशिट दाखल केले होते. आपल्याविरोधात दाखल झालेले प्रकरण रद्द करावे, अशी विनंती करत हेमंत निंबाळकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.