मुंबई इंडियन्सचा विजेता संघ ट्रॉफीसह
वृत्तसंस्था/ मुंबई
महिलांच्या पहिल्या डब्ल्यूपीएल स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱया मुंबई इंडियन्सने रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 7 गडय़ांनी पराभव केला. त्यांना जेतेपदाच्या करंडकाबरोबर सहा कोटी रुपयांचे पहिले बक्षीसही मिळाले.
विजेत्या मुंबई इंडियन्स संघातील अष्टपैलू हेली मॅथ्यूजला स्पर्धावीर पुरस्कारासह पर्पल कॅप मिळाली. तिने या स्पर्धेत 10 सामन्यांत सर्वाधिक 16 बळी मिळविले तर दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगला ऑरेंज कॅप मिळाली. तिने 9 सामन्यांत सर्वाधिक 345 धावा जमविल्या. अंतिम सामन्यातील सामनावीर नॅट सिव्हर ब्रंटने 302 धावा जमवित दुसरे स्थान मिळविले. लॅनिंगने 49.29 च्या सरासरीने व 139.11 च्या स्ट्राईकरेटने या धावा जमविल्या. नॅट सिव्हरने मात्र शेवटच्या बाद फेरीच्या दोन सामन्यात चमकदार प्रदर्शन केले. त्याआधी ती टॉप पाचमध्ये देखील नव्हती.
या स्पर्धेतील एक महत्त्वाची खेळाडू असलेल्या हेली मॅथ्यूजने अंतिम सामन्यात भेदक मारा केल्याने दिल्लीचा डाव कोलमडला. तिने चार षटकांत 5 धावा देत 3 बळी टिपले. यूपी वॉरियर्सच्या सोफी एक्लेस्टोनचेही 16 बळी झाले. पण तिची सरासरी व इकॉनॉमी रेट मॅथ्यूजपेक्षा जास्त असल्याने तिला दुसरे स्थान मिळाले. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सची गोलंदाजी इतरांपेक्षा सरस असल्याचे दिसून आले. बळी घेणाऱया टॉप टेन गोलंदाजांत मुंबईच्या अमेलिया केर, नॅट सिव्हर ब्रंट, सायका इशाक, इसी वाँग व मॅथ्यूज यांचा समावेश आहे.
बीसीसीआय सचिव जय शहांकडून मुंबई इंडियन्स संघ चे अभिनंदन
मुंबईत रविवारी झालेल्या महिलांच्या पहिल्या प्रिमीयर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धो अजिंक्यपद मिळविणाऱया हरमनप्रीत कौराच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्स संघचे बीसीसीआयो सचिव जय शहा यांनी खास अभिनंदन केले आहे.
रविवारी या स्पर्धेतील झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली पॅपिटल्सा 7 गडय़ांनी पराभव केला. ब्रेबॉर्न स्टेडियमवर या सामन्यावेळी शौकिनांनी खूपा गर्दी केली होती. या सामन्यात नॅट सिव्हर ब्रंटो नाबाद अर्धशतक तसा मुंबई इंडियन्साया गोलंदाजांनी केलेल्या दर्जेदार कामगिरीमुळे त्यांना या स्पर्धो विजेतेपद मिळविता आले. बीसीसीआयो सािाव जय शहा यांनी आपल्या ट्विटरवर विजेत्या मुंबई इंडियन्स संघो खास अभिनंदन केले असून या स्पर्धेमुळे महिलांया क्रिकेटला नवी ऊर्जा मिळाली असून देशातील अनेक युवतींना संधी उपलब्ध होत असल्यो त्यांनी या अभिनंदन संदेशात म्हटले आहे.