ऑनलाईन टीम / हैदराबाद :
टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेसच्या मुलींच्या वसतिगृहासमोर चक्क एक पोलीसच हस्तमैथुन करताना सापडला. ही घटना चार महिन्यांपर्वीची असून, त्याचा व्हिडिओ शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला.
संबंधित पोलीस कर्मचाऱयावर मागील चार महिन्यात कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र, शनिवारी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आदिबाटला पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी दखल घेतली संबंधित पोलीस कर्मचाऱयावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेसच्या मुलींच्या वसतिगृहासमोर 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता एका झाडाच्या बाजूला या पोलिसाने हे कृत्य केले. विद्यार्थीनींने त्याचे हे कृत्य कॅमेऱयात टिपले. तरीही त्याचे कृत्य सुरूच होते. अखेर विद्यार्थीनींनी आरडाओरडा केल्याने त्याने पलायन केले.
त्यानंतर विद्यार्थीनींनी राचकोंडा पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र, त्यांची तक्रार त्यावेळी ऐकून घेण्यात आली नसल्याचे विद्यार्थीनींनी म्हटले आहे.