ऑनलाईन टीम / हैद्राबाद :
तेलंगणाची राजधानी असलेल्या हैद्राबादमधील एका औषधे निर्माण करणाऱ्या फॅक्टरीला शनिवारी भीषण आग लागली असल्याची घटना घडली. ही घटना हैद्राबादमधील बोल्लाराम भागात असलेल्या औद्योगिक विकास क्षेत्रात विंध्य ऑर्गेनिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये घडली. या आगीत 8 लोक गंभीररित्या भाजले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या फॅक्टरीमध्ये साॅल्वेंट ठेवले होते. त्यामुळे ही आगीने मोठ्या प्रमाणात पेट घेतला. गंभीररित्या भाजलेल्या आठही जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरू असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
साॅल्वेंट असल्यामुळे आग खूप वेगाने पसरली आणि संपूर्ण परिसरात काळ्या धुराचे ढग तयार झाले. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.